भांडूप इथल्या ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीची पोलीस चौकशी सुरु
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या भांडूप इथल्या ड्रीम्स मॉलमध्ये काल लागलेल्या आगीची पोलीस चौकशी सुरु करण्यात आली आहे.
या मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागलेली आग तिसऱ्या मजल्यावरच्या सनराईज कोवड हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्यामुळे ९ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या रूग्णालयातल्या २ रुग्णांचा कोविडमुळे या दुर्घटनेआधीच मृत्यू झाला होता. ७८ उपचाराधीन रुग्णांपैकी ६८ जणांना अग्नीश्मन दलाने सुरक्षित बाहेर काढलं. य़ा आगीचं कारण अद्याप निश्चित झालेलं नाही.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.