खाजगी शाळांमधील शुल्काबाबत सूचना पाठविण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आवाहन

  ‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यत रद्द

मुंबई : खाजगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना शालेय शिक्षण विभागाने गठीत केलेली समिती ग्राह्य धरणार आहे. दरम्यान, पुढील एक महिना www.research.net/r/feeregulation या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.