मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड - एटीएस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड झाला आहे, असं एटीएसनं आज बातमिदारांना सांगितलं. वाझेनं मोबाईल फोन, सीम कार्ड नष्ट केलं, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. हे सीमकार्ड गुजरात मधून खरेदी केलं होते. या प्रकरणात अनेकांचे जाब नोंदवले आहेत.

मनसुखची पत्नी विमला यांचाही जाब नोंदवला आहे. या प्रकरणी आरोपी विनायक शिंदे, नरेश गोरे अटकेत आहेत त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत, असं एटीएसनं सांगितलं.