सर्वाधिक लसीकरण केलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आत्तापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या एकूण ३८ लाख ४ हजार १४२ मात्रा देण्यात आल्या. यापैकी ५ लाख २३ हजार १८७ जणांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. तर ३२ लाख ८० हजार ९५५ जणांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. याबरोबरच सर्वाधिक लसीकरण केलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोचला आहे. महाराष्ट्रा खालोखाल राज्यस्थानात ३७ लाखापेक्षा अधिक जणांचं लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिली आहे. राज्यात काल दिवसभरात राज्यात २ लाख ७४ हजार ३७ जणांना लस दिली गेली.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image