देशात आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख ३७ हजार ६४४ जणांचं कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख ३७ हजार ६४४ जणांचं कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

यात लसीची पहिला मात्रा घेतलेल्या, ७१ लाख १३ हजार ८०१ आरोग्यसेवकांचा समावेश आहे.  तर ३८ लाख ५१ हजार ८०८ आरोग्यसेवकांना लसीची दुसरी मात्रा दिल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

कोरोना विरोधात आघाडीवर काम करणाऱ्या ६९ हजार सेवकांना लसीचा पहिला डोस दिला असून एकूण ४ लाख ४४ हजार सेवकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

तसंच पंचेचाळीस वर्षांवरील आठ लाख दोनशे सत्त्याऐंशी लाभार्त्यांना आणि साठ वर्षांवरील एकूण ४९ लाख २५ हजार लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात आला.

राज्यात आज सकाळी सात वाजेपर्यंत एकूण १० लाख २८ हजार ९११ लाभार्थ्यांचं कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.