राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल - एकनाथ शिंदे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल, तसंच इमारतींच्या पुनर्विकासकामांसह राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी शिंदे यांना काल दिल्लीत लोकमत माध्यम समुहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार यांनाही ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image