हाफकिनला राज्य सरकार पूर्ण पाठबळ देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : हाफकिन इन्स्टीट्युटमध्ये कोरोना लस तयार करण्याची पूर्ण क्षमता असून राज्य सरकार हाफकिनला पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. त्यांनी आज हाफकिन इन्स्टीट्युटला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

हाफकिन बाबत आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी देखील या बाबत सकारात्मकता दाखवली.

भविष्यात देखील कोरोना सदृष महामारी आली तर हाफकिन सारखी संस्था लस बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडेल, त्यामुळे या संस्थेला पाठबळ देणं गरजेचं असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

बल्क उत्पादनावर विशेष भर दिला जाईल, तसंच सुक्ष्म पद्धतीनं काम करण्यासाठी एका कंपनिबरोबर बोलणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.