मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठा समाजाच्या विविध संघटनांसोबत संवाद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूया आणि जिंकूयात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीसंदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातल्या विविध संघटनांच्या समन्वयकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

आरक्षणासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ भक्कमपणे शासनाची बाजू मांडत आहेत, ज्या खासगी याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी शासनाबरोबर एखाद्या संघाप्रमाणे, एकेक मुद्दा मांडून समर्थनार्थ आवश्यक पुरावे सादर करावेत, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचवलं.