मॅनकाईंड फार्माचा ओटीसी विभागात विस्तार

 


मुंबई: मॅनकाईंड फार्मा या भारतातील चौथ्या सर्वात मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीने (आयक्यूव्हीएआय, टीएसएनुसार) त्यांच्या उत्पादनांची ओटीसी श्रेणी वाढवली आहे. २०१३ पासून 'हेल्थ ओके' ही मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट औषध विभागाचा भाग राहिली आहे आणि आता या टॅब्लेटला फूड सप्लिमेंट म्हणून ओटीसी विभागामध्ये सामील करण्यात आली आहे. कंपनीकडे ओटीसी उत्पादनांची व्यापक श्रेणी आहे, जी भारतीय बाजारपेठेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

मल्टीव्हिटॅमिन्स मुख्यत्वे फिटेनस व आरोग्यासाठी आणि आजच्या व्यस्तत जीवनशैलीमध्ये ऊर्जा पातळी सामान्य ठेवण्यासाठी सेवन केले जातात. लोकांमध्ये उत्पादनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एज- डिफाइनिंग अनिल कपूर व तरूणांचा आयकॉनिक सुपरस्टार रणवीर सिंग हे आरोग्यदायी व ऊर्जादायी जीवनशैलीबाबत संदेशाचा प्रसार करण्याकरिता एकत्र आले आहेत. ही जोडी सर्वोत्तम आहे, या जोडीमधील एक म्हणजे अनिल कपूर, जे आरोग्यदायी जीवनशैलीचे प्रतीक आहेत आणि दुसरे म्हणजे रणवीर सिंग, जे त्यांच्या सुपर-एनर्जेटिक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. हे दोघेही 'हेल्थ ओके'चे समर्थन करतात.  

'हेल्थ ओके' या मल्टीव्हिटॅमिन व मिनरल टॅब्लेट्स शरीरातील ऊर्जा राखण्यासाठी नॅच्युरल जिन्सेन्ग व टॉरिनचे अद्वितीय सुत्रीकरण, एकूण आरोग्य सुधारण्यासाठी २० मल्टीव्हिटॅमिन व मिनरल्स आणि रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी जीवनसत्त्व क, ड व झिंकच्या माध्यमातून आधुनिक जीवनशैली आजारांशी सामना करण्यामध्ये मदत करतात.

मॅनकाईंड फार्माच्या विक्री व विपणन विभागाचे महाव्यवस्थापक जॉय चॅटर्जी म्हणाले, ''ओटीसी विभागामध्ये 'हेल्थ ओके'चा समावेश करण्यामागे मुख्य कारण होते की आज लोक व्यस्त जीवनशैली जगत आहेत, त्यांना सतत कमी ऊर्जा, थकवा व अशक्तपणाचा सामना करावा लागत आहे. आमचा ओटीसी विभाग विस्तारित करण्याची आमची योजना धोरणात्मकरित्या तयार करण्यात आली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी त्यांची जीवनशैली उत्तम करण्यासोबत आरोग्यविषयक आजारांचे निराकरण करण्यासाठी सोल्युशन्स देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. भावी काळात विद्यमान ब्रॅण्ड्ससोबत सहयोगाने एकूण विभाग अधिक प्रबळ करण्याच्या आणि उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याच्या आमच्या सर्वोत्तम योजना आहेत. दोन मेगा सुपरस्टार्स अनिल कपूर व रणवीर सिंग यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्स म्हणून निवड केल्यामुळे आम्हाला अधिक सक्षम होण्यामध्ये आणि या विभागासाठी जागरूकता निर्माण करण्यामध्ये मदत होईल.''

Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image