आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत नीरज कुमार, स्वप्नील कुसळे आणि चयनसिंह यांच्या संघानं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं.

भारतीय संघानं अमेरिकेच्या संघाचा 47 विरुद्ध 25 गुणांनी सहज पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे बारावं सुवर्ण पदक आहे.संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंत या जोडीनं युक्रेनच्या सेरेय कुलिश आणि अॅना इलीना यांना पराभूत करत 50 मीटर रायफलच्या मिश्र स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.

भारतीय नेमबाजांनी सात रौप्य आणि सहा कांस्यपदकं देखील जिंकली आहेत