केन बेतवा लिंक प्रकल्पाचा शुभारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन – बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येत आहे.

नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन बेतवा लिंक हा पहिला प्रकल्प असेल. या प्रकल्पामध्ये दौधन धरण बांधून, दोन्ही नद्यांना जोडणाऱ्या कालव्याद्वारे केन नदीतून बेतवा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.

याद्वारे १० लाखांहून अधिक हेक्टरवर वार्षिक सिंचन, सुमारे ६२ लाख लोकांना पिण्याचं पाणी आणि १०३ मेगावॉट जलविद्युत निर्मिती करण्यात येईल. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. यातून नदी जोडण्याच्या अनेक प्रकल्पांसाठी मार्ग तयार होऊन देशाच्या विकासात अवर्षण हा अडथळा ठरणार नाही.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image