लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमाकांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार १८३ लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलं. यात एकूण २ लाख ६५ हजार ८६२ लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

२ लाख ३१ हजार ५१८ लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड या लशीची मात्रा देण्यात आली, तर ३४ हजार ३४४ लाभार्थ्यांनी कोवॅक्सीन लशीची मात्रा देण्यात आली.

राज्यात आतापर्यंत ५५ लाख ३१ हजार ३२४ लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमाकांवर आला आहे.