इंधन दरवाढीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सकाळी कामकाज सुरु होताच पेट्रोल डिझेल तसंच गॅससिलेंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी विरोधकांनी केली. काँग्रेस, डावे पक्ष द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजीला सुरुवात केली.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांनी जागेवर जाण्याचं आवाहन करून प्रश्नोत्तराचा तास सुरु केला. मात्र गदारोळ कायम राहिल्यामुळे लोकसभेच कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हिच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उपाध्यक्ष हरीवंश यांनी २ वेळा कामकाज तहकूब केलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image