शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या प्रणालीची प्रमाणपत्र डिजी - लॉकरशी जोडण्याची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओटीपीआरएमएस अर्थात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या प्रणालीची प्रमाणपत्र डिजी -लॉकरशी जोडण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे.

तपासणी केलेली ही प्रमाणपत्रं भारतातल्या विविध सबंधित संस्थांना यामुळे पाहता येणार आहेत. डिजी लॉकरशी ही प्रमाणपत्र जोडली गेल्यामुळे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावरही ही प्रमाणपत्र उपलब्ध होतील.

या प्रमाणपत्रांसाठी असलेलं २०० रूपयांचं शुल्क परीषदेनं माफ केल्याची माहितीही पोखरियाल यांनी यावेळी दिली.