भारतानं 2024 पर्यंत देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित - प्रल्हादसिंह पटेल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं 2024 पर्यंत देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दुप्पट करून देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत एका चर्चेत उत्तर देताना याबाबत माहिती दिली. कोविड-19च्या साथीमुळे फटका बसलेल्या पर्यटन क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारतात अधिक पर्यटक येण्यासाठी योग, साहसी खेळ, आरोग्य यांच्यासह पर्यटनाच्या सगळ्या आयामांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी सोळा वर्षांचा विक्रम मोडल्याची माहिती त्यांनी दिली.