महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार अधिकार प्रदान
• महेश आनंदा लोंढे
पुणे : जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच विविध मागण्यांकरिता विविध संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने केले जातात. तसेच 11 मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव आहे. या कारणास्तव कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार 13 मार्च 2021 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यांनी कळविले आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे, कोणत्याही मिरवणूका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्यावेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा प्रसंगी अडथळा न होऊ देणे, त्यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यांमध्ये घाट किंवा घाटावर, सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी, देवालय आणि इतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलम 33, 35, 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे आदेश देणे इत्यादी अधिकार प्रदान करण्यात आले असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी कळविले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.