इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा ऑफलाईन होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतल्या जातील, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टं केलं. काल  चेंबूर इथं झालेल्या पालक-शिक्षक मेळाव्यात त्या बोलत होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  परिक्षा कशा पद्धतिनं घेतल्या जातील या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्टं केलं.

काही ग्रामीण भागात अजुनही इंटरनेटची सुविधा नाही, तसंच अजुनही काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखाची असल्यानं त्यांच्याकडे साधन सुविधा नसल्यानं  ऑनलाईन परिक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे परिक्षा ऑफलाईन  पद्धतिनंच घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image