बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी अभिनेत्री कंगनाचा पालिकेकडे अर्ज

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगनाच्या खार इथल्या इमारतीमधल्या तीन घरांच्या एकत्रिकरणासाठी केलेलं बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे अर्ज केल्याची माहिती कंगनानं काल उच्च न्यायालयाला दिली. कंगनाने पालिकेच्या विरोधातली याचिका मागे घेतली आहे.

न्यायालयाने तिला बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी चार आठवड्यात पालिकेकडे अर्ज करण्याचे आदेश दिले होते, आणि तोपर्यंत कठोर कारवाईपासून संरक्षण दिले आहे.

बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती, त्याविरोधात कंगनाने दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. कंगनाला दिलासा द्यायला न्यायालयानं नकार दिल्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image