गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत - नितीन गडकरी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत, असं प्रतिपादन केंद्रीय रस्तेद वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल वर्धा इथं ‘वर्धा मंथन २०२१ ग्राम स्वणराजची आधारशिला’ या विषयावर आयोजित दोन दिवसाच्याा राष्ट्रीय कार्यशाळेच्याा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
गाव समृद्ध करणं, युवकांना रोजगार देणं तसंच कृषि सुधारणांसाठी संचार, समन्वटय आणि सहयोग या त्रिसूत्रीवर काम करणं आवश्यरक आहे. ग्रामीण उत्पाटदनांना चालना देण्यावसाठी नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच विपणन करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
पेट्रोल आणि डीजलला पर्याय म्ह्णून सीएनजी, इथेनॉल, बायोगॅस यांना प्रोत्सारहन दिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. विदर्भातले नागपुर, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा हे जिल्हेह डीजल मुक्तत करण्यााचं आवाहनही गडकरी यांनी केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.