पेजावार स्वामी यांनी घेतली राज्यपालांची भेट

  पेजावार स्वामी यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: उडुपी, कर्नाटक येथील श्री पेजावार अधोक्षज मठाचे स्वामी विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

अयोध्या राम मंदिर तीर्थ क्षेत्र न्यासाचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेल्या श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांनी अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदिर निर्माण कार्याबद्दल माहिती दिली.

यावेळी नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विश्व हिंदू परिषदेचे राज्य सचिव रामचंद्र रामुका, विहिंप महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष रामस्वरुप अगरवाल तसेच पेजावर मठाचे व्यवस्थापक रामदास उपाध्याय उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image