कृषी कायद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षातल्या बहुतेक सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन जोरदार घोषणाबाजी करत चर्चेची मागणी केली. या गदारोळातच अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा तहकुबीची घोषणा केली.