तांत्रिक कारणामुळे शेअर बाजारातले व्यवहार आज दुपारी पावणे बारापासून बंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : तांत्रिक कारणामुळे राष्ट्रीय शेअर बाजारातल्या व्यवहारांमध्ये सकाळपासून अडचणी येत असल्यामुळे शेअर बाजारातले व्यवहार आज दुपारी पावणे बारापासून बंद करण्यात आले आहेत, राष्ट्रीय शेअर बाजारानं ही माहिती दिली.

बाजारातल्या व्यवहारांसाठी गुंतवणूकदारांनी दिलेल्या सर्व ऑर्डरही रद्द करण्यात आल्या आहेत. दूरसंचार यंत्रणेतल्या  बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली असून लवकरात लवकर ही समस्या दूर करुन व्यवहार सुरू होतील, असं राष्ट्रीय शेअर बाजाराने कळवलं आहे.

मुंबई शेअर बाजारात मात्र व्यवहार नियमित सुरू आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांत सकाळपासून सुमारे २४० अंकांची वाढ होऊन ५० हजार अंकांच्या पातळीवर  व्यवहार सुरू आहेत.