मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली 'सावित्री' 'सॅटलाईट कॉलर' ची पहिली मानकरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पहिल्यांदाच बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या एका बिबट्याला 'सॅटलाईट कॉलर' लावली आहे. मानव आणि बिबटया संबंध, तसंच मानवी वस्त्यांमध्ये बिबटे वावरताना त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

सॅटलाईट कॉलर लावलेला बिबट्या मादी असून तिचं नाव 'सावित्री' आहे. पहिल्या टप्प्यात २ बिबटे आणि दुसऱ्या टप्प्यात ३ बिबटे अशा ५ बिबट्यांना 'सॅटलाईट कॉलर' लावली जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी ही माहिती दिली.