एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए.राजीव यांना सक्तवसुली संचालनालयानं समन्स बजावला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एमएमआरडीए, अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए.राजीव यांना सक्तवसुली संचालनालयानं समन्स बजावला आहे.

२०१४ ते २०१७ मध्ये टॉप सिक्युरिटीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सुरक्षा दिली होती. या कालावधीत एमएमआरडीए आयुक्त उरविंदर पाल सिंह मदान हे होते.

मदान निवृत्त झाल्यानंतर २०१४ ते २०१७ मधील पुरावे तपासले जातील. एमएमआरडीए आयुक्त आर. ए.राजीव हे स्वत: सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात आज दुपारी १२:०० वाजता उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.