महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड केली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी आणि फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी या लाभार्थ्यांची निवड केली असल्याचं कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं.

ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. या आर्थिक वर्षात शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही तर पुढच्या आर्थिक वर्षात शेतकऱ्याला नव्यानं अर्ज करण्याची गरज नाही. त्याचा या वर्षाचा अर्ज पुढच्या वर्षीही ग्राह्य धरला जाईल, असं भुसे यांनी सांगितलं.