ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी आमने सामने

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटात आज जपानच्या नाओमी ओसाका आणि अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी यांच्यात अंतिम लढत होणार आहे. महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्यफेरीत जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला सरळ सेट्समध्ये पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. ओसाका दुसऱ्यांदा ऑस्ट्रेालियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर जेनीफरनं पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य सामन्यात ओसाका हिच्याकडूनच जेनिफरला हार पत्करावी लागली होती. पुरूष एकेरीचा सामना गतविजेता नोवाक जोकोविच आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात होणार आहे.