देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यावर पोचला आहे. काल ११ हजार ८५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ११ हजार ४२७ नवे कोरोबाधित आढळले. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या १ कोटी ७ लाख ५७ हजार ६१० झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत १ कोटी ४ लाख ३४ हजार ९८३ रुग्ण  बरे झाले. सध्या १ लाख ६८ हजार २३५ रुग्ण  उपचाराधीन आहेत.

आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण फक्त १ पूर्णांक ५६ शतांश टक्के आहे. काल ११८ रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे देशातली कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ५४ हजार ३९२ झाली आहे. देशाचा कोविड मृत्यूदर १ पूर्णांक ४४ शतांश टक्के आहे.