गेल्या ५ वर्षात १ कोटी २ लाखाहून अधिक उद्योगांची नोंदणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या ५ वर्षात नवीन १ कोटी २ लाख सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांनी नोंदणी केली असल्याची माहिती सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे. उद्योग आधार पोर्टलवर २०१५ ते जून २०२० या कालावधीत १ कोटी २ लाख ३२ हजार ४६८ उद्योगांनी नोंदणी केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

या क्षेत्राच्या विकासासाठी एमएसएमई मंत्रालयाने अनेक योजना राबवल्या आहेत. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत सरकारने या कोविड काळात या क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली असल्याचेही त्यांनी सांगितले.