पुण्यातल्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोनं सुरु केलेल्या कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा जावडेकर यांच्या हस्ते प्रारंभ

 

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोनं सुरु केलेल्या कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा आज माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कोरोना लसीकरणासंदर्भातले गैरसमज दूर करण्यासाठी ही मोहीम आयोजित केली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.

कोविड१९ प्रतिबंधिक लसीकरणात ५० लाखाचा टप्पा पार करणारा भारत जगातला पहिला देश ठरला असल्याचं ते म्हणाले.

या मोहीमेअंतर्गत अत्याधुनिक संवाद यंत्रणांनी सुसज्ज १६ वाहनं आणि ४०० लोककलाकारांचा ताफा महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमधल्या विविध ठिकाणी जाणार आहे. ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोविड-१९ प्रतिबंधिक लसीकरणाबद्दल जनजागृती करणार आहेत.