विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभातही प्रधानमंत्री मार्गदर्शन करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात मार्गदर्शन करणार आहेत. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल जगदीप धनखर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल निशंक हेही सहभागी होणार आहेत.

एकूण २ हजार पाचशे ३५ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान केली जाईल. विश्वभारती हे देशातील सर्वात जुने केंद्रीय विद्यापीठ असून गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी १९२१ मध्ये त्याची स्थापना केली होती.