कृषी कायद्यांविरोधात ट्विट करून परदेशी कलाकारांना उत्तर देणं योग्य - रामदास आठवले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनांविषयी परदेशी कलाकारांनी, केलेल्या ट्विटला उत्तर म्हणून इथल्या खेळाडू आणि कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करायच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निषेध केला आहे. लोकशाहीत सरकारच्या निर्णयाला विरोध करायचा अधिकार आहे, तसाच त्याला समर्थन करायचाही अधिकार आहे.

त्यामुळे चौकशी करायचा राज्य सरकारचा निर्णय लोकशाहीच्या चौकटीत बसणारा नाही असं आठवले यांनी म्हटलं आहे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर हे भारतरत्न आहेत, त्यांना स्वतःचे विचार आहेत, या दोघांनीही ट्विट करून परदेशी कलाकारांना उत्तर देणं योग्यच आहे, अशा शब्दात आठवले यांनी या दोघांनीही केलेल्या ट्विटचंही समर्थन केलं आहे.