तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई

 See the source image

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या तसंच नियमांचं पालन न करणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनानं तीन महिने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे.

तसंच ही बंदी सहा महिन्यांपर्यंत का वाढवू नये याची कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे.

देवी मंदिरात पाळी नसतानाही गाभाऱ्यात प्रवेश करून केल्याबद्दल, सहा महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी का करु नये, अशा प्रकारच्या कारणे दाखवा नोटिसा १६ पुजाऱ्यांना बजावल्या असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली आहे.