आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ९४ वावं अधिवेशन नाशिक इथं होणार आहे. साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली.

मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केल्या जातील, असंही ठाले पाटील यांनी सांगितलं.