संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव

 

पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड मधिल आपला आवाज - आपली सखीच्या संचालीका संगिता तरडे यांना समाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल उत्तुंग भरारी पुरस्कार कलाकार श्रेया तुपे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सोनम पाटील, आर. जे. बंड्या आदी उपस्थित होते.