दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच अध्यक्ष ठरणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अमेरिकेत गेल्या आठवड्यात कॅपिटल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसदीय गटानं काल देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी ठराव सादर केला. 

येत्या काही दिवसांत या ठरावावर मतदान होणार आहे. हा ठराव सादर झाल्यानं दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत.  राज्यघटनेच्या २५ व्या घटनादुरुस्ती कलमाचा आधार घेत उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी ट्रम्प यांना पदावरून दूर करावे, अशी विनंती डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी केली होती, मात्र रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी याला विरोध केला.

दरम्यान, अध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळं देशात चिंतेचं वातावरण असतानाच हंगामी अंतर्गत सुरक्षा मंत्री चॅड वूल्फ यांनी राजीनामा दिला आहे. देशात नुकत्याच झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि ट्रम्प यांच्या स्थलांतरितांच्या धोरणांबाबत न्यायालयानं प्रतिकूल निकाल देत आपल्या मंत्रीपदावरील नियुक्तीवर शंका व्यक्त केल्यामुळं राजीनामा देत असल्याचं वूल्फ यांनी म्हटलं आहे. 

 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image