पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान देशांमध्ये प्रवास न करण्याचा अमेरिकाचा आपल्या देशाच्या नागरिकांना सल्ला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांच्या प्रवासाबद्दल पुनर्विचार करण्याचे आणि अफगाणिस्तानाला न जाण्याचे आवाहन केले आहे.

या तिन्ही देशांसाठी स्वतंत्र प्रवासी सल्लागारांची नेमणूक करण्यात आली असून कोविड१९, दहशतवाद , अपहरण , सशस्त्र संघर्ष आणि सांप्रदायिक हिंसाचारांच्या पार्श्वभूमीवर या देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.