सर्वोच्च न्यायालयात होणारी मराठा आरक्षणावरची सुनावणी ५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणावरची सर्वोच्च न्यायालयात होत असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आजपासून ही सुनावणी सुरु होणार होती. राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली.ही सुनावणी प्रत्यक्षरित्या करता येईल का, किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल या बद्दल पाच फेब्रुवारीला न्यायालय निर्णय देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.