यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीच्या परीक्षा १ मे नंतर होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिल नंतर आणि दहावीच्या परीक्षा १ मे नंतर घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावामुळे ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यात महापालिका क्षेत्रात नववी आणि दहावीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत.