देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यकम होत असून, मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं आहे. स्वामी विवेकानंद हे सर्वांचं प्रेरणास्थान असून जगाच्या नकाशावर भारताचं स्थान ठळक करण्याचं कार्य त्यांनी केलं आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

अत्युच्च बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेले स्वामीजी हे खरे देशभक्त होते, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गरिबी, अज्ञान, भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या खाईतून भारताला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नायडू यांनी युवकांना केलं आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंदांना ट्वीटद्वारे अभिवादन केले आहे. स्वामीजींनी भारतातलं ज्ञान, संस्कृती, तत्वज्ञान जगापुढे आणलं. भारतीय युवक हे आपलं आशास्थान असल्याचं ट्वीट मोदी यांनी केले आहे. तर,स्वामीजींनी भारतातलं ज्ञान, संस्कृती, तत्वज्ञान जगापुढे आणलं. विवेकानंदांच्या विचारांची मदत घेऊन युवकांनी भारताला गतवैभव मिळवून द्यावं, असं ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.