बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे. तसेच राज्य सरकारने या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध खबरदारीच्या उपायांबरोबर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रशासनाला अनेक सूचना दिल्या. मध्यप्रदेशात केवळ कावळ्यांमध्येच बर्डफ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आला असून, अजून तरी पोल्ट्री व्यवसायात त्याची लागण झाली नसल्याची माहिती काल देण्यात आली.

राज्यसरकार सतर्क असून, पोल्ट्रीव्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.   

दरम्यान, आंध्र प्रदेशात बर्ड फ्ल्यूचे एकही प्रकरण आढळून आलेले नसून राज्यातल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोंबडीपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे आंध्र प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाचे संचालक डॉ. अमरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.

राज्यातील वन विभाग सर्व परदेशी पक्षांचे अधिवास आणि जंगलातील प्राण्यांवर लक्ष ठेवून आहे असेही कुमार यांनी सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशात बर्ड फ्ल्यूचे एकही प्रकरण आढळून आलेले नसून राज्यातल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोंबडी पालन करणाऱ्या व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे आंध्र प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाचे संचालक डॉ अमरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.

राज्यातील वन विभाग सर्व परदेशी पक्षांचे अधिवास आणि जंगलातील प्राण्यांवर लक्ष ठेवून आहे असेही कुमार यांनी सांगितले.

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image