मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने ४९ हजाराची पातळी ओलांडली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने आज ४९ हजाराची पातळी ओलांडली. दिवसअखेर निर्देशांक ५२१ अंकांची वाढ झाली आणि तो ४९ हजार ३०४ अंकांच्या नव्या उंचीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १३८ अंकांची वाढ झाली आणि तो १४ हजार ४८५ अंकांवर बंद झाला. वाहन, माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू आणि औषधनिर्मिती कंपन्यांचे समभाग आज तेजीत राहिले.