मुंबईत उपनगरी रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भातला लवकरच निर्णय - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत उपनगरी रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आयोजित बैठकीत आढावा घेतला. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्यानं गर्दी होऊ नये अशा पद्धतीनं उपनगरी सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल, यादृष्टीनं विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image