देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला केंद्र सरकारची परवानगी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला परवानगी देण्यात आली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. चित्रपटगृह चालकांनी शक्यतो ऑनलाइन तिकीट विक्रीवर भर द्यावा. त्याचप्रमाणे चित्रपटांच्या दोन खेळांमध्ये पुरेसा अवधी ठेवावा. स्वच्छता आणि आरोग्यासंबंधींच्या नियमांचं योग्यरीतीनं पालनं करावं असही सांगण्यात आल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केला.

चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स आणि प्रेक्षागृहांसाठी सर्वसाधारण नियमावली तयार करण्यात आली आहे. तरीही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेऊन या व्यतिरिक्त उपाययोजनांचा विचार करता येईल असंही त्यांनी नमूद केलं. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मात्र ही परवानगी देण्यात आलेली नाही.