कृषी कायदे आणि इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेसचा नागपुरातल्या राजभवनाला घेराव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेसनं नागपुरातल्या राजभवनाला घेराव घालण्याचं आंदोलन केलं. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात क्रीडा मंत्री सुनील केदार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक आमदार आणि हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काटोल नाका इथून काढलेल्या टॅक्टर रॅलीतही विदर्भातुन काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते .मात्र पोलिसांनी सुरक्षेच्या अनुषंगानं ही टँक्टर रॅली काटोल रोड वरच्या  चौकात थांबवली . त्यानंतर झालेल्या सभेत, केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा राज्यात काँग्रेस मोठं आंदोलन उभारेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला.