‘बर्ड फ्लू’ बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
• महेश आनंदा लोंढे
पुणे : अंडी, चिकन शिजवून खाल्ल्यास कोणताही अपाय होत नाही, असे सांगून नागरिकांनी 'बर्ड फ्लू' संदर्भात चुकीच्या माहितीवर आधारित कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करुन पुणे जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झालेले अद्याप आढळून आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाच्या वतीने ‘बर्ड फ्लू’ समन्वय सभा आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त शीतलकुमार मुकणे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बर्ड फ्लू च्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाबरोबरच पशुसंवर्धन विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगून महापालिकेने मदत कक्षामधून नागरिकांना योग्य ती माहिती द्यावी. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी असणाऱ्या पाणथळाच्या जागांवर विशेष लक्ष द्यावे. एखादा पक्षी मयत झालेला आढळल्यास त्याद्वारे संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे यांनी बर्ड फ्लू च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.