एम. वेंकैया नायडू यांनी राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं यादृष्टीनं सहकार्य करण्याचं आवाहन नायडू यांनी बैठकीत केलं.

सभागृहात होणाऱ्या सर्व चर्चांमध्ये संपूर्ण सहभाग असेल, असं आश्वासन सदस्यांनी दिलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना अधिक वेळ मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. आजच्या बैठकीत सहा मंत्री आणि विविध पक्षांचे २५ नेते उपस्थित होते.