राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त प्रधानमत्र्यांचा मुलींना सलाम
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील मुलींना त्यांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वाला सलाम केला आहे. यासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले असून शिक्षण, प्रवेश, आरोग्य सेवा आणि लैंगिक संवेदनशीलता सुधारण्यासह मुलींच्या सबलीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.
मुलींच्या सबलीकरणासाठी आणि त्यांना प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी, त्यांना संधी प्राप्त करून देण्यासाठी काम करीत असलेल्या सर्वांचे विशेष कौतुक करण्याचा दिवस असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.दरम्यान या दिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली.
लैंगिकतेवर आधारित पक्षपात थांबवणं आणि मुलींचे जगणे संरक्षित तसच सुनिश्चित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. या योजनेद्वारे समन्वयित आणि एकसंध प्रयत्नांद्वारे मुलींचे शिक्षण आणि सहभाग याची खात्री देता येते.
जिल्हास्तरीय घटकासाठी १०० टक्के आर्थिक सहाय्य असलेली ही मध्यवर्ती योजना असून त्यासाठीचा निधी थेट आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतो. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर २०१४-१५ मध्ये असणारं बाल लैंगिक गुणोत्तर ९१८ होतं ते २०१९ -२०२० मध्ये ९३४ वर पोहोचलं आहे.तर एकंदर नोंदणी प्रमाणही ७७ टक्क्यांवरून ८१ टक्क्यांहून अधिक झालं आहे.
दरम्यान या योजनेमुळे शाळांमध्ये मुलींची नोंद वाढली असून लिंग गुणोत्तरात अभूतपूर्व सुधारणा झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुलींना स्वावलंबी बनवण्याच्या सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार देखील शहा यांनी केला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी देखील देशभरातल्या मुलींना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.