भारत आणि ऑस्टेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाची पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिल्यामुळे, भारत-ऑस्टेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रलियाला पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी दिली.

वॉशिंग्टन सुंदर ६२ आणि शार्दूल ठाकूर ६७ यांच्या सातव्या विकेट साठीच्या १२३ धावांच्या भागीदारीमुळं भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला.

आजचा खेळ संपला तेंव्हा ऑस्टेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद २१ धाव केल्या आहेत.