विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात निवडणूक आयोगानं आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी राज्यांना मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत.

या अधिकाऱ्यांची त्यांच्या स्वतःच्या राहत्या जिल्ह्यांमध्ये नेमणूक करू नये असं आयोगानं सांगितलं आहे. तसंच तक्रारी अथवा कोणतीही कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी देऊ नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

२०१९ च्या निवडणुकांमध्ये महत्वाची जबाबदारी निभावलेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या धोरणातून वगळावं असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.