कर्तव्य सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने दोन बरे झालेले मनोरुग्ण पोहचले आपआपल्या घरी

 


पुणे: मागच्या आठवड्यात कर्तव्य सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा अलकाताई गुजनाळ  ह्यांना येरवडा हॉस्पिटलमधून फोन आला ,’ ताई ,दोन महिला आहेत त्यांचा उपचार झाला आहे ,आणि आता त्या पूर्णपणे बर्‍या झालेल्या आहेत, त्यांची प्रकृती आणि मानसिक स्थिती आता पूर्वीसारखी बरी झाली आहे, पण आता हॉस्पिटलला त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी आर्थिक सहाय्यतेची गरज आहे. तुमच्या ओळखीत कोणी सहकार्य करणारे असेल तर पहा, ताईंनी लगेचच हा मेसेज कर्तव्य सामाजिक संस्थेच्या सभासदांना कळवले  आणि काहीजणांनी लागलीच मदतही केली.

कर्तव्य सामाजिक संस्थेच्या मदतीच्या आधारे सदर दोन महिलांना त्यांच्या घरी पाठविण्याचे ठरले. आणि त्या महिलांना निरोप देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष  सौरभ अमराळे सह कर्तव्य सामाजिक संस्थेची टीम तेथे येरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयात पोहचली. तेथे सदर महिलांची चौकशी केली, तसेच त्यावेळी येरवडा हॉस्पिटलचे समनव्यक बापूसाहेब माने सर यांनी हॉस्पिटलसंबंधी असणारी सर्व माहिती सांगून, कामाची रूपरेषा, मनोरुग्ण आणि त्यांचे प्रकार, त्यांच्यावर उपचार देत असताना किती जोखीम असते आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते ह्याची सर्व माहिती दिली. यानंतर सदर महिलांची त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठीची सर्व तयारी करण्यात आली. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप जाता यावे म्हणून हॉस्पिटलकडून दोन आया (नर्स सांभाळ करणार्‍या) त्यांच्यासोबत पाठविण्यात आल्या. इथून पुढे देखील कर्तव्य सामाजिक संस्था, आपल्याला शक्य होईल तशी मदत करेल असा विश्‍वास सौरभ अमराळे यांनी हॉस्लिटलला दिला. ह्यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष अलकाताई गुजनाळ , खजिनदार ऋषिकेश सणस, अभिजित रोकडे, अक्षय नवगिरे आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 समाजातील एक वेगळा घटक म्हणून न पाहता ह्यांना आपलाच समाज म्हणून आपण सामान्य माणसे का स्वीकारत नाही ह्याची खंत सौरभ अमराळे यांनी ह्यावेळी व्यक्त केली. 

तसेच सदर महिलांच्या निरोप देत असतांनाच ह्या ठिकाणी आणखी एक चांगल सामाजिक कार्य कर्तव्य सामाजिक संस्थेकडून झाले. लालबत्ती विभागातील  सेक्सवर्कर ताईची एक मुलगी मतिमंद  होती, ती  लॉकडॉन मध्ये घरातुन बाहेर पडली होती आणि ती घरी  पोहचलीच नाही.  ह्या मुलींचा शोध घेण्यासाठी सेक्सवर्कर ताईनी अलका ताईना तिचा एक फोटो दिला होता तो त्याच्यां मोबाईल मध्ये होता  त्याठिकाणी  अर्थिक मदत करायाला गेल्या नंतर  त्या ठिकाणी 200 ते 250 लोकांमध्ये ताईची नजर सदर हरवलेली मुलगी शाहीन वर पडली व तिची ओळख पटली.


तिची फाईल चेक केली.  ह्या अवस्थेत आपण शोधात असणार्‍या  व्यक्तीला  आपण जेव्हा शोधून काढतोे  तो आनंद खुप मोठा असतो. आज आमची ताई मनापासुन आनंदी झाली जिला त्या मनापासुन शोधात होत्या. या यशामुळे कर्तव्य  पुर्ण पणे पार पाडले त्यांचे समाधन कर्तव्य सामाजिक संस्थेच झाले.


कर्तव्य सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी वर्गाला एक वेगळया अनुभवाची अनुभूती आली, माणूस म्हणून जगताना आपण माणसाला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतोय ,आणि माणसाच्या वेगवेगळ्या अंगांचे पैलू इथं दिसतात ,ह्यात कधी तो बालपणात विसरभोळा असतो, तर कधी तरुणपणात शुद्ध हरपलेला, इथे काम करणार्‍या लोकांचा खूप अभिमान वाटून आला, एक वेगळं जग बघायला मिळाले, तिथे काम करणारे भोसले सर इतर सर्व स्टाफ जे मनोरुग्णाची काळजी घेतात आणि हे सगळे लवकर बरे होऊन त्यांच्या घरी त्यांच्या माणसात जावेत आणि सुखाने राहावे ही आशा बाळगणारा स्टाफ पाहून कुठेतरी देवमाणस असतात अशी जाणीव झाली.